चारा छावण्या तातडीने सुरू करा पुरेसा, पाणीपुरवठा देण्याचीही केली सूचना

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यात आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे योग्य नियोजन करणे तसेच धरणातील गाळ काढण्याच्या कामाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या सभापती अनिता बनकर यांनी पंचायतीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण काळात होऊ नये, तसेच पाणीटंचाई उद्भवल्यास नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये शेतकरी पशुपालकांना दिलासा देण्यासाठी पशुधनाच्या चारा व पाण्याची उपलब्धता महत्त्वाची आहे.

व त्यामुळे संबंधित यंत्रणेने योग्य नियोजन करावे. चारा छावण्यांमध्ये पशुधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही सभापतींनी दिल्या. 

या वेळी पंचायत समितीचे उपसभापती भगवान आहेर, सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष म्हस्के, पंचायत समिती सदस्य, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी; तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.